ससून रुग्णालयातून पुन्हा आरोपी पळाला

ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपीने बुधवारी (दि.26) सकाळी पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विनयभंगाच्या गुह्यात कराड तालुका पोलिसांनी त्याला अटक करून ससून रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, यापूर्वी देखील आरोपी पळाल्याच्या घटना घडल्या आहेत. संतोष यशवंत साठे (52) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.