सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी छत्तीसगडमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. छत्तीसगडच्या दुर्ग येथे पोलिसांनी एका एक्स्प्रेसमधून प्रवास करताना आरोपीला पकडले आहे, असा दावा आरपीएफ पोलिसांनी केला आहे. मात्र मुंबई पोलिसांकडून याला अद्याप दुजोरा देण्यात आला नाही.
‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, ताब्यात घेतलेली व्यक्ती रेल्वेने प्रवास करत होती. आरोपी हा एक्स्प्रेसमधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं.
दरम्यान, याआधी मुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती. मात्र या चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. आताही ज्या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या आरोपी सारखा दिसतो. मात्र हाच तो हल्लेखोर आहे का, हे पोलीस तपासातून समजू शकेल.