एलन मस्क श्रीमंतीत पुन्हा जगात ‘नंबर वन’

टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. बर्नार्ड अरनॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले. मस्क यांच्या संपत्तीत एआय कंपनीमुळे भरभराट झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार, एलन मस्क यांची एकूण संपत्ती 209.7 डॉलर अब्ज (जवळपास 17.48 लाख कोटी) रुपये आहे, तर बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती आता 200.7 अब्ज (जवळपास 16.61 लाख कोटी) रुपये आहे. चार महिन्यांपूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेले अरनॉल्ट तिसऱया क्रमांकावर घसरले आहेत, तर जेफ बेझोस 16.73 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱया स्थानावर आहेत.

 जगातील टॉप 10 श्रीमंत

एलन मस्क – 17.48 लाख कोटी रुपये

 जेफ बेजोस – 16.73 लाख कोटी रुपये

बर्नार्ड अरनॉल्ट – 16.61 लाख कोटी रुपये

मार्क झुकरबर्ग – 13.95 लाख कोटी रुपये

लॅरी एलिसन – 12.77 लाख कोटी रुपये

लॅरी पेज – 12.17 लाख कोटी रुपये

सर्गी ब्रिन – 11.66 लाख कोटी रुपये

वॉरेन बफे – 11.14 लाख कोटी रुपये

बिल गेट्स – 10.84 लाख कोटी रुपये

स्टीव बाल्मर – 10.57 लाख कोटी रुपये

अंबानी 11 व्या तर अदानी 18 व्या नंबरवर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत हिंदुस्थानातील एकाही अब्जाधीशाचा टॉप 10 मध्ये समावेश नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी 113.5 अब्ज डॉलर (जवळपास 9.46 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 11 व्या स्थानावर आहेत, तर गौतम अदानी या यादीत 18 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 86.3 अब्ज डॉलर (7.19 लाख कोटी रुपये) आहे.