
टाइम्स नाऊ डिजिटलचे प्रतिनिधी व टीव्हीजेए सदस्य हर्षल भदाणे पाटील याचे धुळे येथे अपघाती निधन झाले आहे. हर्षल भदाणे यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथे भरधाव ट्रकने हर्षल भदाणे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत हर्षल यांचा जागीच मृत्यू झाला. हर्षल भदाणे टाइम्स नाऊ डिजिटलचे प्रतिनिधी व टीव्हीजेएचे सदस्य होते. हर्षल यांच्या अचानक जाण्यामुळे मित्रपरिवरातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी आणि ट्रक चालकाला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांसहित सर्व मित्र परिवाराने केली आहे.