लडाखमध्ये रणगाड्यांसह युद्धसराव करताना नदीची पाणीपातळी वाढली; पाच जवान शहीद

लडाखमध्ये रणगाड्यांसह नदीच्या पाण्यात युद्धसराव करताना हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. नदीच्या पाण्यात युद्धसराव करत असताना पाण्याची पातळी वाढल्याने रणगाडा वाहून गेला. यावेळी रणगाड्यावर तैनात पाचही जवान पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एक जेसीओ आणि चार लष्कराचे जवान शहीद झाल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली.

लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात शुक्रवारी सायंकाळी लष्कराचे जवान रणागाड्यांसह नदी ओलांडण्याचा सराव करत होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) टी-७२ टँकने नदी ओलांडण्याचा सराव सुरू असतानाच अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. नदीच्या प्रवाहात एक रणगाडा वाहून गेला. या रणगाड्यावर पाच जवान तैनात होते. दुर्दैवाने पाचही जवानांना जलसमाधी मिळाली. पाचही जणांचे मृतदेह शोधण्यात लष्कराला यश आले आहे.