बोरघाटात भीषण अपघात; भरधाव ट्रकने पाच गाड्यांना चिरडले, दोघांचा मृत्यू, 12 जखमी

मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातील वाघजाई देवी मंदिराजवळ भरधाव ट्रक मुंबईकडे येत असताना ट्रकने खोपोलीहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या 5 वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक बाजूच्या डोंगरावर जाऊन आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की धडक दिलेल्या 5 वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.

जखमींना लोणावळा येथील संजीवनी रुग्णालय, खंडाळा व खोपोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत बाप आणि 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. हे सर्वजण इर्टिका कारने अलीबाग येथील सहल उरकून घरी परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात रविवारी रात्री 10.15 सुमारास झाला. अपघातात रिक्षा, इनोव्हा कार, इर्टिका, टाटापंच व आयआरबी कंपनीचे दुरुस्ती वाहन यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त मदत पथक आणि बोरघाट पोलीस, खंडाळा पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत केली. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. ट्रकचे ब्रेक फेल झाले की चालकाच्या चुकीमुळे ही घटना घडली याचा तपास लोणावळा पोलीस करीत आहेत.

अपघातातील मृतांची नावे
निलेश लगड (42)
श्राव्या लगड (10)

अपघातातील जखमी
शरयु लगड (38) )
अर्श लगड (5)
अर्शित लगड (5)
अंशिका मोगल (9)
आरव मोगल (6)
सागर इंदुळकर (42)
प्रिया इंदुळकर (34)
रुद्र इंदुळकर (3)
विवेक पाटील (45)
मिताली केरकर (45)

अपघातातील किरकोळ जखमी
संजय वालेकर (41)
विमल वालेकर (69)
अश्विनी जाडकर (43)
जिग्नेश जाडकर (12)