Chandrapur दोन एसटी बस मध्ये अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

ST bus accident

चंद्रपूर मूल मार्गावरील चिंचपल्ली गावाजवळ एसटी महामंडळाच्या दोन बसचा अपघात झाल्याची घटना घडली. या दोन्ही बसचे चालक व वाहक जखमी झाले आहेत. दोन्ही बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना प्राथमिक उपचारासाठी चिचपल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. चंद्रपूर कडून जाणाऱ्या आणि गडचिरोली कडून येणाऱ्या बस मध्ये अपघात झाला. पुढील तपास चिचपल्ली पोलीस करीत आहेत.