Maharashtra Budget Session 2025 – अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित, औरंगजेबची स्तुती भोवली

समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला. हा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

अबू आझमी यांना औरंगजेबचं उदात्तीकरण भोवलं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे अबू आझमी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विधानसभेत निषेध करण्यात आला. विधानसभेत एकमताने अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे.