औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्या अबू आझमीला अटकपूर्व जामीन

औरंगजेबाचे गुणगान गात त्याची स्तुती करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र चौकशीसाठी उद्यापासून तीन दिवस पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले आहेत.

आपल्याला चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची स्थापना केली होती. त्यामुळे आपण औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील युद्ध राज्य कारभाराचे होते. त्यात कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी किनार नव्हती, असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. त्यानंतर अबू आझमींवर टीकेची झोड उठली होती तसेच गुन्हा दाखल करण्यात आला होता.