केंद्र सरकारने आयुषमान भारत योजनेची व्याप्ती वाढवली असून आता 70 वर्षांवरील सर्व हिंदुस्थानी नागरिकांना आयुषमान भारत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या विमा कवचाचा लाभ सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. या ज्येष्ठांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत असतील. या योजनेत आधीच समाविष्ट असलेल्या कुटुंबांना त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी 5 लाख रुपयांचे अतिरिक्त कवच मिळणार आहे. सर्व स्तरांतील 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे भारतीय नागरिक यासाठी पात्र असतील.