स्मार्टफोन व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची निर्मिती करणाऱया ‘सॅमसंग’ कंपनीत मोठा संप सुरू आहे. दक्षिण कोरियातील सुमारे 31 हजार कर्मचारी एकाचवेळी बेमुदत संपावर आहेत. सॅमसंग कंपनीतील एका तगडय़ा युनियनने संपाची हाक दिली. याआधी कर्मचाऱयांनी तीन दिवसांचा संप जाहीर केला होता. मात्र मागण्या पूर्ण न झाल्याने कर्मचाऱयांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला. यामुळे कंपनीच्या उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
द नॅशनल सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स युनियनने सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सेमी कंडक्टर युनिटमधील सहा हजार कर्मचाऱयांनी संप सुरू केला होता. ‘सॅमसंग’मधील एकूण कर्मचाऱयांपैकी एक चतुर्थांश कर्मचारी या युनियनचे सदस्य आहेत.