गेल्या काही वर्षांच हिंदुस्थानने ‘नेमबाज’ या खेळात अनेक शिखरे सर केली आहेत. अनेक नेमबाज राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी करत आहेत. नेमबाजीत अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. नेमबाजीमध्ये जे टॅलेंट आहे ते या देशातील इतर कोणत्याही खेळात नाही. यावरून गेल्या दशकात खेळाने केलेली प्रगती लक्षात येते, अशी उत्स्फूर्त भावना बीजिंग ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारा हिंदुस्थानचा नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केलीय. एका रुग्णालयाला भेट देण्यासाठी गुरगावला आलेल्या बिंद्राने पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या दशकात देशात नेमबाजीचा खूप विकास झाला आहे. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून हिंदुस्थानच्या नेमबाजांचे नेतृत्व केले. एक काळ असा होता की, आम्ही दोन ऑलिम्पिकमध्ये एकही पदक जिंकू शकलो नाही. मात्र, खेळाडूंनी केलेल्या परिश्रमामुळे पॅरिसमध्ये चांगला निकाल लागला. मात्र, भविष्यातील ऑलिम्पिकमध्ये अशीच कामगिरी सुरू ठेवण्यासाठी धोरणात्मक नियोजन आणि तपशिलाकडे लक्ष दिले पाहिजे.