अभिजीत भट्टाचार्यांना महात्मा गांधीबाबत चूकीचे विधान करणे पडले महागात, वकिलांनी पाठवली कायदेशीर नोटीस

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य आपल्या गायन कौशल्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अनेक चित्रपाटातील गाण्यांना आपला आवाज दिलाय. गायन कौशल्यासोबतच अभिजीत आपली मते मांडण्यासाठी ओळखले जातात. मात्र आता त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे अभिजीत अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका पॉडकास्ट चॅनला मुलाखत देताना त्यांनी महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे पुण्यातील एका वकिलाने त्यांना नोटीस बजावली आहे.

अभिजीत भट्टाचार्य यांनी डिसेंबर 2024, मध्ये शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्ट चॅनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिजीत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे. या मुलाखतीत अभिजीत यांनी आपल्या प्रोफेशनल लाईफवर भाष्य केलं. याचबरोबर त्यांनी अभिनेता सलमान आणि शाहरुख खानबाबतही भाष्य केलं. यावेळी बोलण्याच्या ओघात त्यांनी महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असे सांगितले.

“महात्मा गांधी हे भारताचे नव्हे, तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत आधीपासूनच भारत होता. पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. महात्मा गांधींचं इथे राष्ट्रपिता असं चुकीचं वर्णन करण्यात आलं. तेच जन्मदाता होते, तेच पिता होते, तेच आजोबा होते आणि तेच सर्वकाही होते. असे विधान अभिजीत भट्टाचार्य यांनी शुभंकर मिश्रा यांच्या पॉटकास्टवर केले. अभिजीत यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

अभिजीत भट्टाचार्य यांच्या या विधानानंतर पुण्याचे विकिल असीम सरोदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जर भट्टाचार्य़ांनी त्यांच्या वक्तव्यांसाठी तात्काळ माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला सुरू केला जाईल, असे नोटीसमध्ये म्हटलं आहे.