…हा आहे ‘औरंगजेब फॅन क्लब’, अब्दुल सत्तार संभाजीनगरचे पालकमंत्री

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हालहाल करून मारले होते. त्या संभाजी महाराजांचे नाव दिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मिंधे सरकारने आज मंत्री अब्दुल सत्तार यांची नेमणूक केली. मिंधे गटाचे सांदिपान भुमरे संभाजीनगरचे पालकमंत्री होते. लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. तिथे सत्तार यांची वर्णी लावून महायुती म्हणजे औरंगजेब फॅन क्लब असल्याचे मिंधे, भाजपने सिद्ध केले आहे.

भुमरेंच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली निवड केल्याची माहिती सत्तार यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना अगदी अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच दिली. त्यांच्या समर्थकांनी संभाजीनगरमध्ये जल्लोषही केला. संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे अतुल सावे देखील प्रयत्नशील होते. परंतु सत्तार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

सिल्लोड न्यायालयाचे समन्स

2014 आणि 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात गोलमाल केल्याच्या आरोपाखाली सिल्लोड न्यायालयाने अब्दुल सत्तार यांना समन्स बजावले आहे.