आचारसंहितेपूर्वी आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो धावणार

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास सुरू होणार आहे. मुंबई मेट्रो 3च्या आरे-बीकेसी टप्प्याचे लोकार्पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो-3च्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ’ या 32.5 किमीच्या मार्गिकेचे काम मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) करीत आहे. यातील 12.6 किमी लांबीच्या आरे-बीकेसी टप्प्यासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.