वयाच्या दहाव्या वर्षी मणिपूर ते दिल्ली आणि राष्ट्रीय शांतता आणि एकात्मतेसाठी आणि कारगील विजयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कारगील युद्धस्मारक (लडाख) ते राष्ट्रीय युद्धस्मारक (नवी दिल्ली) असा सायकल प्रवास करणाऱ्या अंधेरीच्या आरव भारद्वाजचा नुकताच ‘राष्ट्रीय बालवीर’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अंधेरी पश्चिम विधानसभेचे उपविभागप्रमुख प्रसाद आयरे यांनी आरवचे अभिनंदन करत त्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.