
सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 34 वसाहतींमध्ये ‘आपला दवाखाना’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाने ‘वन रूपी क्लिनिक’सोबत सामंजस्य करार केला आहे. कुलाबा कफ परेड, चेंबूर, पंतनगर-घाटकोपर, कन्नमवार विक्रोळी, महावीर नगर-कांदिवली, प्रतीक्षा नगर-शीव, अॅण्टॉप हिल-वडाळा, आदर्श नगर-ओशिवरा, सांताक्रुझ, अंधेरी, वांद्रे, जुहू, कुर्ला, मानखुर्द, माहीम, कांदिवली, बोरीवली येथील विविध म्हाडा वसाहतींत दवाखाना उभारण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून संबंधित वसाहतींतील नागरिकांना परवडणाऱया दरात आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहेत. वैद्यकीय तपासणीकरिता नागरिकांकडून एक रुपया तर इतर वैद्यकीय तपासण्या केवळ 10 रुपयांमध्ये केल्या जाणार आहेत. म्हाडा वसाहतींच्या आवारात दवाखाना सुरू करण्यासाठी 400 चौरस फुटांची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.