मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती, सरकारकडून 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

सरकारने आज सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची बदली मुंबई शहर जिल्हाधिकारीपदी केली असून जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. किनवट उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कवली मेघना यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. गडचिरोलीतील कुरखेडा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी असलेले रणजित मोहन यादव यांना गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपी प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.