आजोबांनी घडवलेल्या मॉडिफाय सायकलवर आनंद महिंद्रा फिदा

वय हा निव्वळ आकडा आहे. तुमची कल्पकता आणि शोध तुम्हाला कधी थांबवू शकत नाही. ज्येष्ठ नागरिक सुधीर भावे यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. सुधीर भावे यांना सायकल मॉडिफाय करण्याचा छंद आहे. त्यांनी कल्पकतेने अनेक सायकली अनोख्या पद्धतीने मॉडिफाय केल्या आहेत. त्यांच्या या काwशल्यावर उद्योगपती आनंद महिंद्रा एकदम खूश झाले आहेत. त्यांनी सुधीर भावे यांना वडोदरा येथील वर्कशॉपमध्ये काम करण्याची ऑफर दिली आहे. सुधीर भावे निवृत्त मेपॅनिकल इंजिनीयर आहे. त्यांनी बॅटरीवर चालणारी सायकल तयार केलीय. जी एकदा चार्ज केल्यावर 50 किलोमीटर धावते. पेडलिंग करून चालवता येते. सुधीर भावे अशा वेगवेगळ्या सायकल तयार करतात. जवळच असलेल्या वर्कशॉपमध्ये जावून ते काम करतात. भावेंचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केलाय. या व्हिडिओत भावेंनी मॉडिफाय केलेल्या अनेक सायकली आहेत. काही सायकली चालवताना जिमिंग करता येते. त्यासाठी भावेंनी जिमची उपकरणे वापरली आहेत.