Aamir Khan- आमिर खानला नेमकी कशाची भिती सतावतेय! शाहरुख, सलमानबद्दल आमिरने केले असे भाष्य

बॉलिवूडमधील तिन्ही खान हे कायमच चर्चेचा विषय राहिलेले आहेत. यामध्ये आमिर, सलमान आणि शाहरुख हे सूपरस्टार तर आहेतच. परंतु या तिघांच्याही वैयक्तिक आयुष्यातीलही अनेक चढ-उतार हे त्यांच्या फॅन्ससाठी कुतूहलाची बाब आहे. परंतु सतत लाइमलाइटमध्ये आणि माध्यमांच्या गराड्यात राहणाऱ्या या तारकांनाही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती ही सतावत असते.

नुकतेच एका मुलाखतीच्या माध्यमातून आमिर खानने त्याला वाटणाऱ्या भीतीविषयी अगदी स्पष्टपणे उल्लेख केला. आमिर म्हणतो की, ”आपण खान त्रिकूट चिरकाळ सर्वांच्या स्मरणात राहणार नाही. तर आपल्यानंतर येणारी पिढीसुद्धा चांगलेच सूपरस्टार असणार आहेत. त्यामुळेच आपण शेवटचे स्टार नसून, आपल्यानंतर बरेच जण स्वतःला स्टार म्हणून सिद्ध करतील.”

 

 

आमिर खानने मुलाखतीच्या दरम्यान स्टारडमच्या बदलत्या स्वरूपाबद्दलचे त्याचे दृष्टिकोन सुद्धा यावेळी मांडले. तो म्हणाला  काळानुसार लोक हळूहळू त्याला, सलमान खान आणि शाहरुख खानला विसरून जातील. तो पुढे म्हणाला, “आपली गणनाही होणार नाही. प्रेक्षकही सर्व विसरतील, काळ पुढे जातो. जगाची ही रीत आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश. महेश विनाशाची काळजी घेतो आणि मग माणसं सर्वकाही विसरतात.”

या मुलाखती दरम्यान तिन्ही खान एकत्र काम करणार या चर्चांवरही त्याने पटकथेची वाट पाहात आहोत असे उत्तर दिले. नुकताच आमिरने त्याचा 60 वा वाढदिवस मुंबईत एका पार्टीत साजरा केला. या पार्टीला उपस्थित राहिलेल्या खास पाहुण्यांमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान होते. माध्यमांशी चर्चा किंवा संवाद साधताना आमिरने कायमच माध्यमांना खाद्य पुरवले आहे. आमिर हा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो.