
मुलगा जुनैदचा सिनेमा ‘लवयापा’ वाजतगाजत पडद्यावर आला. सिनेमातून बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर मोठय़ा पडद्यावर झळकली, परंतु हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यामुळे आमीर खानला प्रचंड दुःख झाल्याची प्रतिक्रिया स्वतः आमीरने दिली आहे. या प्रोजेक्टकडून प्रचंड आशा होत्या, असे आमीरने म्हटले आहे.
सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा खिडकीच्या बाहेर बघायलाही भीती वाटत होती. हृदय धडधडत होते, असा अनुभव आमीरने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितला. असे असले तरीही जुनैद उत्तम अभिनेता असून त्याच्या हातात आणखी अनेक सिनेमे आहेत. त्यात आमीर खान प्रोडक्टशनचाही सिनेमा आहे. यात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीही आहे. त्याच्यात टॅलेंट आहे. त्यामुळे नक्कीच त्याला यश मिळेल, असे आमीर खानने म्हटले आहे.