बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आपला मुलगा जुनैद खानचा अपकमिंग सिनेमासाठी एक्सायटेड आहे. मुलाला सिल्व्हर स्क्रिनवर चमकताना तो पाहू इच्छित आहे. जुनैद आता दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर हिच्यासोबत ‘लव्हयापा’मध्ये दिसणार आहे. अशातच मुलाच्या सिनेमाच्या यशासाठी आमिरने एक संकल्प केला आहे.
जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा मच अवेटेड सिनेमा ‘लव्हयापा’ चे टायटल ट्रॅक नुकतेच रिलीज झाले असून प्रेक्षकांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. 24 तासाच्या आत या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, सोशल मीडियावर 15 मिलीयन व्ह््यूज मिळाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता ‘लव्हयापा’ सिनेमाच्या प्रदर्शनावर लागल्या आहेत. अशातच आमीर खानने आपल्या मुलासाठी खास संकल्प केला आहे. जर मुलगा जुनैद याच्या ‘लव्हयापा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली तर तो स्मोकिंग सोडून देणार असे जाहीरच करुन टाकले आहे. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानने शपथ घेतली आहे की, जर त्याच्या मुलाचा ‘लव्हयापा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला तर तो धूम्रपान सोडेल.
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान आमिरने या सिनेमाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, हा सिनेमा मला फार आवडला. फार मनोरंजक आहे. या सिनेमात मोबाईल आणि तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य कसे बदलले आहे, तंत्रज्ञानामुळे आयुष्यात होणाऱ्या मनोरंजक गोष्टी त्यात दाखवण्यात आल्या आहेत. सिनेमात सर्वच कलाकारांनी चांगले काम केल्याचे आमिर म्हणाला. विशेष म्हणजे आमिरने खुशी कपूरच्या अभिनयाची तुलना तिची आई श्रीदेवीशी केली आहे. तो म्हणाला सिनेमा पाहताना श्रीदेवी आणि तिच्यातील काम करण्याची ऊर्जा मी खुशी कपूरमध्ये पाहत होतो. मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खान 10 जानेवारी रोजी या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करणार आहे.