![Marathi sahitya Sammelan](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-11-2-696x447.jpg)
देशाच्या राजधानीत सात दशकांनंतर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अभिजात गीताचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री यांच्या हस्ते सोमवारी झाले. ‘आम्ही असू अभिजात’ असे या गीताचे बोल आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर या खास गीताची रचना करण्यात आली आहे.
‘आम्ही असू अभिजात’ गीत डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिले असून संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. संमेलन गीताला प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि हरिहरन यांच्यासह मंगेश बोरगावकर, सागर जाधव, शमिमा अख्तार यांचा स्वर आहे.
गडकरी यांनी संमेलन गीताचे कौतुक करताना शंकर महादेवन व हरिहरन यांच्यासारख्या दिग्गज गायकांच्या स्वरांमुळे या गीताची निर्मिती खऱ्या अर्थाने अभिजात झाल्याचे म्हटले. नागपूर येथे झालेल्या प्रकाशन सोहळय़ाला संगीतकार आनंदी विकास, विकास देशमुख, अनिल मुळजकर, आदित्य विकास, योगेश कदम उपस्थित होते.