सरकार आहे कुठे? नक्की कशात व्यस्त आहे? मुंबईतील प्रश्नांवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न जनतेला भेडसावत आहे. अशा अनेक समस्यांना सध्या मुंबईकर सामोरे जात आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करत त्यांना फटकारले आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबईत पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे, मात्र सरकारकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुरक्याची जाड चादर पसरलेली आहे, पण सरकारकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. कोणताही ठोस प्लान नसताना मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत, त्यावरही सरकारकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. ट्राफिक जॅम, विस्कळीत ट्राफिकवरही सरकार काही बोलत नाही. मग हे सरकार आहे कुठे? नक्की कशात व्यस्त आहे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.