
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीड्यातील होलिकोत्सवास उपस्थित राहून होलिका देवतेचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या. शिवसैनिक वरद वरळीकर ह्यांच्या होळीचे दर्शन घेऊन वरळीकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. कै. माणिक धर्मा पाटील जमात ट्रस्टला होलिकोत्सवानिमित्त भेट दिली. विजय मित्र मंडळ वरळी कोळीवाडा येथील मानाच्या (तळ्यातील) होळीचे दर्शन घेतले. उपविभाग प्रमुख हरीश वरळीकर कुटुंबियांसह होलिकोत्सवात सहभागी होऊन सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. नवरंग होळी मंडळाच्या होलिकोत्सवास उपस्थित राहून होलिका देवतेचे दर्शन घेतले.