मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? मुंबईतील टँकरचालकांच्या संपावरून आदित्य ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत ‘पाणीबाणी’ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा राज्य सरकारला इशारा दिला आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

48 तासांत पाणी प्रश्न सोडवा अन्यथा सर्व वॉर्ड ऑफिसवर शिवसेनेचे आंदोलन, आदित्य ठाकरे यांचा इशारा

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत या प्रकरणी राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतरही राज्य सरकार जागे होतना दिसत नाहीये. आज पुन्हा आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

दूषित पाणी, कमी दाबाने येणारं पाणी, अघोषित पाणी कपात अश्या पाण्याच्या अनेक समस्यांनी मुंबईकर गेले काही महिने हैराण आहेत. त्यातच पाणी टॅंकर्सचा संप सुरू झाल्याने मुंबईत अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात महावीर जयंती, आजची हनुमान जयंती, येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे मोठे राष्ट्रीय सण सुरू असताना मुंबईकरांना या समस्येला सामोरं जावं लागतंय. पण वारंवार लक्ष वेधूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्या समस्येकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाहीये का? असा प्रश्न पडतोय! पण मुंबईकर म्हणून आम्ही शांत बसू शकत नाही! पुढच्या ४८ तासात जर हा प्रश्न सुटला नाही, तर शिवसैनिक आणि मुंबईकर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर धडक मोर्चा घेऊन जाणार आणि ‘वॉर्ड ऑफिसर’ ना जाब विचारणार!, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

‘फुले’ चित्रपट कोणत्याही कट शिवाय लोकांसमोर आणणे ही फडणवीसांची जबाबदारी, संजय राऊत स्पष्टच बोलले