टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी एक कि.मी. अंतराची ही शोभायात्रा एका खुल्या बसमधून निघणार आहे. मात्र, ही बस गुजरातमधून आणण्यात आल्याने मुंबईसह महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्यातील मिंधे सरकारवर सडकून टीका केली आहे.
टीम इंडियाचा विजयोत्सव हा महाराष्ट्राची राजधान मुंबईत होत आहे. या विजयोत्सवासाठी गुजरातमधून बस का आणली, बेस्टच्या ताफ्यातील बस का मागितली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता आदित्य ठाकरे यांनीही यावरून राज्यातील महायुती सरकारला भीमटोला लगावला आहे.
हे मिंधे सरकार गुजरातला स्वतःचं सरकारदेखील हलवेल, गुजरातसमोर लोटांगण घातलेलं हे सरकार आहे.@AUThackeray pic.twitter.com/uAIVJStxTy
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 4, 2024
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
हे मिंधे सरकार स्वतःचं सरकारही हलवले. कारण गुजरात समोर लोटांगण घातलेलं सरकार आहे. क्रिकेटपटूंचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. तरीही मुख्य मुद्दा हा आहे की गुजरातच्या बस आपल्या महाराष्ट्रात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.