पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून मैलामिश्रित सांडपाणी आणि उद्योगाचे केमिकल रसायनमिश्रित दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत येत असल्याने तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली असून नदी प्रदूषण वाढल्याने आळंदीत भाविक, नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्थानिकांच्या आणि भाविकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय.
गेल्यावर्षीसुध्दा हा मुद्दा आम्ही प्रशासनाच्या दृष्टीस आणून दिला होता, पण त्यानंतरही कार्यवाही शून्यच!ह्यासंदर्भात… pic.twitter.com/Q7Gg7HQVlZ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 30, 2024
”लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्थानिकांच्या आणि भाविकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. गेल्यावर्षीसुध्दा हा मुद्दा आम्ही प्रशासनाच्या दृष्टीस आणून दिला होता, पण त्यानंतरही कार्यवाही शून्यच. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यानी कटाक्षाने लक्ष देऊन, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या स्वच्छतेचा प्रस्ताव केंद्राकडूनही शक्य तितक्या लवकर मंजूर करून घ्यावा. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदीत सोडणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी.