देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा मिंधेंकडून आणखी एक प्रयत्न, आदित्य ठाकरे यांची टीका

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने त्याच्या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव न घेता विडंबन गीतातून त्यांची सालटी काढली. कुणाल कामराने विडंबन गीतातून केलेली दाढीवाल्याची हजामत मिंधेंना चांगलीच झोंबली आणि त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. जवळपास 40 ते 50 मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी-एमआयडीसी परिसरातील शोच्या सेटवर धुडगुस घातला.

याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत यावरून मिंधेंवर जोरदार टीका केली आहे. ”कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबत जे गाणं सादर केलं ते अगदी शंभर टक्के खरं आहे. त्यानंतर मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी सेटची तोडफोड केली. फक्त भित्री लोकंच एखाद्याने सादर केलेल्या गाण्यावरून अशा पद्धतीने व्यक्त होतात. पण राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचं काय? राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा मिंधेंकडून हा आणखी एक प्रयत्न आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

कुणालने गायलेले गाणे..

ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
एक झलक दिखलाये
कभी गुवाहाटी मे छुप जाये
मेरी नजर से तुम देखो
तो गद्दार नजर वो आये…
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है…
और कहा क्या जाये?
जिस थाली में खाये
उसमेही छेड कर जाये
मंत्रालय से ज्यादा
फडणवीस के गोदी में मिल जाए
तीर कमान मिला है इसको
बाप मेरा ये चाहे
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…