भाजप सरकार कोणाचेही नाही – आदित्य ठाकरे

दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर पाडल्याच्या विरोधात जैन बांधवांनी महापालिका विरुद्ध आंदोलन केलं आहे. सध्या पालिका ही पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्री यांच्या नियंत्रणात आहे. त्यांच्याकडे देरासर वाचवण्याची पूर्ण ताकद अधिकार, पण देरासर वाचवण्याऐवजी ते केवळ नौटंकी करत आहेत. लोढा यांचे एक बेकायदेशीर कार्यालय पालिकेत आहे आणि त्यांना रिअल इस्टेटचा मोठा अनुभकही आहे. सर्वांनी हे लक्षात घ्यावं…भाजप कोणाचंही नाही, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली.