सुरुवातच अशी तर पुढे कसं होणार? खातेवाटपावरून आदित्य ठाकरे यांचा महायुतीला टोला

मंत्रीमंडळ विस्तार होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप सरकारचे खातेवाटप केलेले नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी एक ट्विट करत महायुतीवर टीका केली आहे.

”मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन चार दिवस झाले. हिवाळी अधिवेशन सुरू होऊन चार दिवस झाले. तरिही अद्याप मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. लोकांचे प्रश्न कुणासमोर मांडाचे हे आमदारांना समजत नाहीए. महायुतीतील तीन पक्षांत खूप गोंधळ सुरू आहे. ज्यांनी ज्यांनी शपथ घेतल्यायत त्यांच्यात किती स्वार्थ आहे. आनंदाने लोकांची सेवा करण्याऐवजी ते खातेवाटपावरून भांडण्यात व्यस्त आहेत. हा निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा अपमान आहे. जर सुरुवात अशी असेल तर पुढे हे कसं होणार?, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.