जी भाजप देशाला, महाराष्ट्राला संपवायला निघाली आहे, अशा भाजपसोबत आम्ही कसं जाऊ शकतो – आदित्य ठाकरे

”जी लोकं धर्माच्या नावावर लोकांना जाळू शकतात, दुसऱ्यांची घरं जाळू शकतात. दहा वर्षामध्ये एकतरी गोष्ट अशी झाली आहे का ज्यात शाश्वत विकास झाला आहे. यांनी 2014 ला जे जुमले केले त्या स्मार्ट सिटी प्रोग्रामचं काय झालं, स्वच्छ भारत, नोटबंदीचं जीएसटी, आधारचं काय झालं? जी भाजप देशाला, महाराष्ट्राला संपवायला निघाली आहे, अशा भाजपसोबत कसं आम्ही जाऊ शकतो”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांनी भाजपला फटकारले आहे. टीव्ही 9 च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांचं मत मांडलं तसंच मिंधे भाजप सरकारची सालटी काढली.

”खरंतर गेली अनेक वर्ष मी महाराष्ट्रात फिरतोय. 2010 ला जेव्हा मी राजकारणात आलोय तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नेहमीच पोहोचतो तिथे. मागचे माझे दोन तीन दौरे माझे गाजले कारण भाजपमधल्या माझ्या मित्रांना वाटत होतं की माझे दौरे गाजवावे म्हणून ते तिथे आले होते. पण हे जे घटनाबाह्य अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलंय त्यांचे पाय जमिनीवर आहे का? ते महाराष्ट्रातून चालतं का? महाराष्ट्राच्या हितासाठी चालतं का? सध्या महाराष्ट्रात कोणतंही क्षेत्रं बघितलं तरी ते कोलमडलेलं आहे. गृहमंत्रालय बघा. काल बदलापूरात गोळीबार झाला. महाराजांचा पुतळा पडला. वामन म्हात्रेला अटक झालेली नाही. दुसरीकडे सरकार आपल्या धुंदीत मस्त आहे. त्यांचे इव्हेंट सुरू आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”महाराष्ट्राचं सरकार गुजरातमधून चालतं. गुजरातसोबत आमचं वैर नाही. आमच्या वेळीही केंद्रात भाजपचं सरकार होतं. ज्या भाजपने आमचं सरकार पाडलं. त्याच भाजपचं गेली साडे वर्ष महाराष्ट्रात सरकार होतं. केंद्रात दहा वर्ष बहुमताचं राज्य केलंय. हे सगळं असताना महाराष्ट्राचं जे हाल झालेले आहेत त्याला जबाबदार भाजदप आहे. भाजप नेते गडकरी म्हणाले की काहीही फुकट मिळत असेल तिथे हिंदुस्थानचे लोकं पहिले येतात. य हा आपल्या देशाचा अपमान आहे. हेच गडकरी इतक्या मिनिटात पाच किलोमीटर रस्ता बांधतो असा दावा करतात. यांना मुंबई गोवा हायवेवर एवढे खड्डे आहेत हे विचारा. याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलं होतं. याला भाजप जबाबदार आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार पाडूनही तुम्ही जनतेला हवं तसं सरकार नाही चालू शकत”,

”फडणवीस म्हणतात आम्ही सगळ्या प्रकरणात राजकारण आणतो. आम्ही राजकीय मंडळी समाजातील आवाज बुलंद करत असतो. अराजकीय प्रश्न आम्ही विचारले तर ते राजकीय होतात. ते समाजातील प्रश्न आहेत. ते आम्ही विचारले तर ते राजकीय होतात. कोव्हिडच्या काळात आम्ही लोकांचे जीव वाचवायला जे निर्बंध लावलेले त्याचंही यांनी राजकारण केलं. जगात जर एकमेव पक्ष असा असेल ज्याने कोव्हिडच्या काळात राजकारण केलं तो भाजप आहे. कोव्हिडच्या काळात मध्य प्रदेशचं सरकार पाडलं. मंदिरांचं राजकारण केलं. कोव्हिडच्या काळात राजकारण करणारा पक्ष भाजप आहे”, असो टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

ते बदलापूरच्या आंदोलनाला पण राजकीय वळण देतायत. त्या आंदोलनात कुठे राजकीय पक्ष, होर्डिंग दिसलं का? महिलांसाठी आवाज उठवण्यात जर एखादा राजकीय नेता उतरला तर काही चुकलं का? भाजपची शाळा म्हणून आठवडाभर एफआय़एर घेत नाही तेव्हा जर कुणी आंदोलन केलं तर काही चुकलं का? तीन वर्षाच्या मुलीसाठी रस्त्यावर उतरलं, त्याच्यावर काही बोललं की राजकीय होतं. हे असं कसं? आणि आम्ही त्याला राजकीय करूच कारण जे तुमचं महाराष्ट्र द्वेष्ट सरकार आहे. ते सरकार हटविण्यासाठी प्रत्येक गोष्ट राजकीय करावीच लागेल कारण राजकारणच देशात बदल घडवू शकतं’, असे सडेतोड उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले.

”जे पक्ष शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात त्यांच्यासाठी जोडे हे कमीच आहेत. आम्ही त्यांना काहीही मारू शकतो. पंतप्रधान मुख्यमंत्री येणार म्हणून यांनी तिथे जे हेलिपॅड बांधले. त्या हेलिपॅडवर पुतळ्यापेक्षा जास्त खर्च झाला आहे. यांनी बांधलेला स्टॅच्यु ऑफ युनिटी इतके वर्ष उभा आहे आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असा तयार केला. हे गुजरात आणि महाराष्ट्रात दुजाभाव करत आहात. इथं मुख्यमंत्री निर्लज्जपणे सांगतात की 45 च्या वेगाने वारे वाहत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

”मुंबादेवीच्या मंदिराजवळ स्थानिक भाजपच्या आमदारांना कॉरिडॉर करायचा आहे. वर्षानुवर्षे दागिना बाजार बसला आहे, शंभर वर्षे जुनी दुकाने आहेत, ती तिथून हलवायची आहेत. मुंबादेवी मंदिरामागे भाजपच्या काँट्रॅक्टरला सतरा मजली वाहनतळ उभारायचे आहे. ज्याने मंदिर पूर्णपणे झाकले जाणार आहे. हे तुमचं हिंदुत्व आहे? त्या मंदिराच्या मागे खटाऱ्या गाड्यांचं डम्पिंग यार्ड झालं आहे. हे हिंदुत्व विकायला निघालेले भाजप आहे, ही कमर्शियल भाजप आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.