शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. तसेच आदित्य ठाकरे यांनी शपथ न घेऊन संविधानाचा अपमान केला असे म्हणणाऱे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आदित्य ठाकरे जोरदार टोलाही लगावला.
”चंद्रशेखर बावनकुळे चीनचं, मकाऊंचं संविधान मानतात. आम्ही या देशाचं संविधान मानतो. आम्ही या देशाच्या संविधानसाठी लढत आहोत. ज्या संविधानाचा अपामान करून तुम्ही महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार दोन वर्ष बसवलं, महाराष्ट्राची लूट केली. ज्या संविधानाचा अपमान करत तुम्ही ईव्हीएमचा जुगाड करून जिंकलात त्या विरोधात आम्ही लढतोय”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. त्याबाबत बोलताना आदित्य़ ठाकरे म्हणाले की, ”इंडिया आघाडी आपल्या लोकशाहीसाठी लढत आहे. ममता दिदी देशातील एक मोठ्या नेत्या आहेत. अरविंद केजरीवाल देखील आमच्यासोबत आहेत. ते आता दिल्लीत निवजणूका लढवत आहेत. त्यांच्या त्यांच्या राज्यात त्यांचे चांगलं काम करतायत. केंद्रात लवकरच इंडिया आघाडीचं सरकार येईल. म्हणूनच हे ईव्हीएमचे घोळ घालत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.