सगळी भांडणं सोडा व गृहविभागाबाबत जाहीर करा; वाढत्या गुन्हेगारीवरून आदित्य ठाकरे यांचे सरकारला आवाहन

राज्यात महायुती सरकारमध्ये गृहमंत्रीपदावरून वाद असल्याचे दिसून येत आहे. सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस झाले तरी अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक गुन्हेगारी प्रकरणं समोर आली आहेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले असून लवकरात लवकर गृहमंत्री जाहीर करा, असे आवाहन केले आहे.

”गेल्या काही दिवसांत राज्यात बरंच काही घडलं आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. पु्ण्यात गेल्या 48 तासात किती गुन्हे घडले आहेत. या राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत. गृहविभाग कोणाकडे आहे ते स्पष्ट तरी करा. गृहविभाग खूप महत्त्वाचा असतो. गुन्हेगारीला कंट्रोलमध्ये ठेवायचं काम गृहविभागाकडे असतं. त्यामुळे सगळी भांडणं सोडा व गृहविभागाबाबत जाहीर करा” असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी महायुतीला केले आहे.