भाजप-कोश्यारींनी सुरू केलेली परंपराच अबू आझमी पुढे घेऊन जाताहेत, सर्वांवर कारवाई व्हावी! आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

सपा नेता अबु आजमी का विवादास्पद बयान सामने आया है. उन्होंने कहा कि औरंगजेब ग्रेट राजा थे. उनके समय में भारत सोने की चिड़िया था. औरंगजेब की कब्र खोदने की बात करने वाले भाजपा नेता साम्प्रदायिक सौहार्द खराब कर रहे हैं. मुसलमानों को दबाया जा रहा है. अबु आजमी के इस बयान पर आदित्य ठाकरे ने अबू आजमी के गिरफ्तारी की मांग की है.

वादग्रस्त विधानं करणाऱ्यासाठी ओळखले जाणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ‘औरंगजेब एक महान राजा होता, त्याच्या काळात हिंदुस्थान ‘सोने की चिड़िया’ (सोन्याचा धूर निघत होता) होता. औरंगजेबाची कबर खोदण्याची भाषा करणारे भाजप नेते सामाजिक सलोखा खराब करत आहेत, मुसलमानांवर दबाव आणला जात आहे’, असं वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केलं आहे. त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. भाजप-कोश्यारींनी सुरू केलेली परंपराच अबू आझमी पुढे घेऊन जात आहेत, तेव्हा सर्वांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कुणी असं वक्तव्य असेल तर मुख्यमंत्री कारवाई करताय त्याकडे आमचं लक्षं आहे. राज्य कुणाचं आहे? सत्ताधारी कोण आहेत? अटक झाली आहे? कारवाई झाली आहे? म्हणजे हे सगळं जे प्रेम दाखवतात ते स्टेजवरून बोलण्यासाठी दाखवतात की कारवाई करतील याकडे लक्षं आहे. जे चुकतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. महाराजांचा अपमान झाला तर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज लागते? असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. त्यासोबतच अबू आझमी, सोलापूरकर, कोरटकर तिघांवर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना बेड्या ठोकल्याच पाहिजेत असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावलं.

‘काही ठराविक लोकं बँकॉकला जाताना तुम्हाला पाच तासात सापडतात मग जे महाराष्ट्रात महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला?’ अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी खडसावलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करण्याची प्रथा जी माजी राज्यपाल कोश्यारी यांनी पाडली होती, तिच प्रथा भाजप आणि भाजपची सुपारी घेणाऱ्या लोकांनी सुरूच ठेवल्याचंही ते म्हणाले.