नेते आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेला आणि पर्यटनमंत्री असताना मलबार हिल येथे सुरू केलेला नेचर ट्रेल वॉकवे प्रकल्प जानेवारीत मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मलबार हिलच्या हिल स्लोपवरून चालण्याचा आनंद मिळणार आहे आणि त्याचवेळी समोर गिरगाव चौपाटीचा मनमोहक नजाराही पाहता येणार आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर आज याबाबतचे पह्टो आणि माहिती शेअर केली.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी 2021 ला पर्यटन मंत्री असताना मलबार हिल येथे नेचर ट्रेल प्रोजेक्ट सुरू केला होता. हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होणार असून येत्या जानेवारी महिन्यात त्याचे उद्घाटन केले जाणार असल्याचे समजते.
मिंधे सरकारमुळे रखडला होता प्रकल्प
आदित्य ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत या प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. 2021 मध्ये मी पर्यटन मंत्री असताना सुरू केलेला प्रोजेक्ट पूर्ण होत आहे हे बघून आनंद होतोय. 2022-24 दरम्यान मिंधेंनी हा प्रोजेक्ट थांबवला होता. मात्र, जेव्हा मी पत्रकारांना घेऊन प्रोजेक्टच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर पुन्हा त्याचे काम सुरू करण्यात आले. या ठिकाणावरून मुंबईकरांना मलबार हिलच्या हिल स्लोपवरून चालण्याचा एक जबरदस्त अनुभव मिळणार आहे तसेच तिथून गिरगाव चौपाटीचा मनमोहक नजारादेखील पाहायला मिळणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.