अरविंद केजरीवालजी तुम्ही बाहेर येऊन लोकशाही आणि संविधानासाठी लढा देण्यास पुन्हा सज्ज झालात याचा खूप आनंद वाटतो आहे. नाहीतर एकीकडे आपल्याच माणसांशी दगाफटका करून पळ काढणारे भेकड गद्दार असतात आणि दुसरीकडे अरविंदजींसारखे सत्यासाठी लढा द्यायला उभे ठाकतात. सत्यमेव जयते! असा सणसणीत टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे यांचे नाव न घेता एक्सवरून लगावला आहे.
केजरीवाल काय म्हणाले
माझ्या सुटकेसाठी प्रार्थना करणाऱया तुम्हा सर्वांचे आभार. मला तुरुंगात डांबल्यावर मी खचेन, असे या लोकांना वाटत होते. पण, माझी ताकद शंभर पटीने वाढली आहे. देशाला आतून पोखरणाऱया, कमकुवत करू पाहणाऱया या देशद्रोही शक्तींविरुद्ध आपला लढा सुरू ठेवू, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.