निवडणूक आयोग मारकडवाडीला का घाबरतोय? आदित्य ठाकरे यांचा सवाल

मॉक पोलपेक्षा बॅलेट पेपरवर मतदान व्हावे ही मारकडवाडीतील जनतेची मागणी आहे. मॉक पोलमुळे काही बदलणारे नाही. सरकार बदलणार नाही किंवा निवडणूक आयोगाचा निर्णय बदलणार नाही, पण सत्य काय आहे हे तर समजेल. कारण हा देश सत्यमेव जयतेवर चालतो, सत्तामेव जयतेवर नाही. सत्तामेव जयतेवर सरन्यायाधीश चालतात असा जोरदार हल्ला करतानाच, निवडणूक आयोग मारकडवाडीला का घाबरतोय, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी  केला. मारकडवाडीला जाणार का अशा प्रश्नाला उत्तर देताना, नक्कीच जाणार, असे ते म्हणाले.