योगायोग बघा, परवा भेटीगाठी झाल्या हा राजकीय डाव असू शकतो…, हिंदी सक्तीवरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून भाजपसह महायुतीवर हल्ला चढवला आहे. योगायोग बघा परवा ज्या भेटीगाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल, एकामेकांना आयडीया देण्यासाठी असेल, एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल, पाठिंबा देण्यासाठी असेल, विरोध हे सगळं जे काही चालतं यातून कादाचित एक डाव असू शकतो, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपसह महायुतीवर घणाघात केला.

नुसतं राजकारणाच्या दृष्टीकोणातून पाहायचं का? हा एक विषय आहे. सक्ती, सक्ती नाही हा एक वेगळा विषय होतो. राजकारणात पाहायचं असेल तर योगायोग बघा परवा ज्या भेटीगाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल, एकामेकांना आयडीया देण्यासाठी असेल, एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल, पाठिंबा देण्यासाठी असेल, विरोध हे सगळं जे काही चालतं यातून कादाचित असा डाव असू शकतो. बिहारची निवडणूक येत आहे, भाजपला तिथे गरज आहे. मुंबई महापालिकेची लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या आम्ही मराठीचा घेतो, दोघांचा फायदा लोकं मरतील याच्यात बाकी काय. आपलं तर निट चालून जाईल, असा यांचा विचार असू शकतो. कारण या भेटीनंतर योगायोगाने त्यांच्याच गटाच्या मंत्र्याने हे परिपत्रक काढलेलं आहे, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

दुसरी गोष्ट याच्यात जर थोडा म्हणजे सेन्सिबली विचार केला तर असं आहे की, आमचं मत स्पष्ट आहे. मराठी ही सगळ्यांना महाराष्ट्रात आलीच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे, जी जागतिक पातळीवर आपण पाहिलं तर अनेक जागितक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल घेतलं. त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्रजी देखील शिकवायला सुरू केलं. जगाचं अर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनॅन्शिअल सेंटर असेल एक महत्त्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसंच आपली मुंबई, महाराष्ट्र तेवढाच महत्त्वाचा या देशासाठी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तिसरी भाषा असेल मग ती हिंदी किंवा दुसरी कुठलीही आपल्या देशातील भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल वेगवेगळ्या देशांमधील ही शिकणं गरजेचं आहे का? वैयक्तीत मत विचाराल तर जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. जगात असेल, देशात असेल व्यावहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची-ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे सगळ्यात कठीण परीक्षा असते युपीएससीची. आयएएस, आयपीएस अधिकारी त्यातून येतात. कुठलाही आयएएस, आयपीएस बघा तुम्ही मातृभाषा येते, हिंदी येते, इंग्रजी येते आणि स्थानिक ज्या राज्यात जे कॅडर मिळतं त्यांना ती पण ते शुद्ध बोलतात, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आम्ही विकास विरोधी नाही, पण महाराष्ट्राचा विनाश होऊ देणार नाही! लाखो झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरे यांचा खणखणीत इशारा

“पहिलीपासून शिकत असताना तीन भाषा हा मुलांवर आपण जास्त दबाव टाकत नाहीत का?” 

कुठल्याही भाषेला विरोध, सक्ती किंवा समर्थन करत नाही, विषय आपल्याकडे मांडतो. कारण यात अभ्यासपूर्ण मत मांडणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. आपली आता जी शिक्षणपद्धती आहे. त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिकायला मिळतं जसं मुंबई महापालिका शाळांमध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, सेमी इंग्रजी आहे, हिंदी आहे, गुजराती, उर्दू, तमिळ, तेलुगु, कन्नडा आहे. यात आम्ही सीबीएसई, आयसीएसई बोर्ड आणलं. आमच्या सरकारनी एक नक्की केलं की, तुमची स्थानिक भाषा म्हणजे आपली मराठी भाषा ही दहावीपर्यंत सक्तीची असावी, प्रत्येकाला मराठी यावी. मग बाकीचं तुम्ही कुठल्या भाषेत शिकवाल हे त्या-त्या शाळेचं योगदान असेल. पण हे करत असताना तुम्ही हा विचार केला पाहिजे की, पहिलीपासून शिकत असताना तीन भाषा हा मुलांवर आपण जास्त दबाव टाकत नाहीत का? कदाचित तुम्ही असंही करू शकता ज्युनिअर, सिनिअर केजीपासून मराठी घ्या. मग थोडं थोडं इंग्रजी इन्ट्र्युड्यूस करा. मगत तिसरी भाषा हिंदी असेल किंवा दुसरी कुठली असेल हे चौथी-पाचवीपासून जसं आम्ही आतापर्यंत शिकत आलो. जेवढ्या भाषा येतील तेवढं समर्थन करतो. पण विद्यार्थ्यांवर पहिलीपासून किती दबाव टाकणार? आताचा शिक्षणाचा घोळ बघितला जे मंत्र्यांनी परिपत्रक काढलेलं आहे, त्यांना एक तरी भाषा शुद्ध लिहिता येईल का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

पहिलीपासून शिक्षक नवीन घ्यावे लागतील. जो भार हा सरकारवर पडणार आहे, तेवढे पगार देऊ शकणार आहेत का? आताच शिक्षक भरती होत नाही. लाडकी बहीणमध्ये आठ लाख महिलांना दीड हजार नाही आता पाचशे रुपये मिळणार आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांना 56 टक्के पगार मिळतोय. हे सगळं होत असताना तुम्ही हे सक्तीचं करू म्हणता, पण जी यंत्रणा आहे ती उभी करण्यात तुम्ही सक्षम आहात का? दुसऱ्या बाजूला तुम्ही यूनिफॉर्ममध्ये घोटाळे करता. गणवेश तुम्ही वेळेवर देऊ शकत नाही आणि तुम्ही तिसरी भाषा शिकवणार आहात आणि सक्तीची करणार? अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

एका बाजूला जग एआयवर काम करतंय, तिथे या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने काय केलं? देशामध्ये आता तंत्रज्ञान असेल, एआय असेल अजूनही काही गोष्टी असेल याच्यात विचार करण्यापेक्षा देशाला कशात व्यस्त केलं जातं? एका बाजूला देशात आपण धर्मावरनं भांडतो, दुसऱ्या बाजूला जातीवरनं भांडतो, तिसऱ्या बाजूला शिक्षणपद्धतीत आपण कुठल्या भाषेत शिकावं? यावर वाद सुरू झालेत. यापेक्षा देशात मोठं दुर्दैवं काय? हे वाद केंद्र सरकारने निर्माण केलेत. मुख्यमंत्र्यांनी सविस्तर विचार केला पाहिजे. कुठल्याही भाषेला विरोध नाही जोपर्यंत पहिली ते दहावी मराठी सक्तीची आहे. पण जेव्हा आपण नवीन भाषा शिकतो, जगाशी स्पर्धा करताना आपण कुठल्या इयत्तेती आणली पाहिजे? आणि आपली शिक्षण पद्धती आता आहे त्याच्यात ती सुटेबल आहे का? आणि ती कशी सुधारू शकतो? इथून सुरुवात झाली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.