Aaditya Thackeray – आदित्य ठाकरे यांनी घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केल्या तीन प्रमुख मागण्या

मुंबा देवी मंदिराजवळचं पार्किंग दूर झालं पाहिजे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुंबईतल्या रस्त्यांचं ऑडिट व्हावं अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त भुषण गगराणी यांची भेट घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी या मागण्या केल्या.

आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबा देवी मंदिराच्या मागे भाजपच्या कंत्राटदारासाठी दोन पार्किंगच्या इमारती बांधल्या जात आहेत. 17 मजली इमारतीच्या दोन इमारती बांधल्या गेल्या तर मंदिर झाकलं जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. या पार्किंगमुळे वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्यांना तिथून हलवलं जाईल. मंदिराला न झाकता हे पार्किंग दूर ठिकाणी झालं पाहिजे ही आमची मागणी आहे.

तसेच देवनारसाठी आणि देवनार स्वच्छ करण्यासाठी मुंबई पालिकेला जे पैसे लागतील तो अदानी कर तो कचऱ्याचा युसर फी मधून लागू होणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. तसेच धारावीत छोट्या दुकानदारांवर मालमत्ता कर लावण्यात आला आहे, उद्या हाच कर झोपडपट्ट्यांवर लावला जाईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 510 स्के फुटावरील घरांवरचा मालमत्ता कर माफ केला होता. पण आज हेच भाजपचं सरकार मुंबादेवी सरकारविरोधात काम करतंय, धारावीच्या दुकानदारांच्या विरोधात काम करतंय तसंच मुंबईकरांवर अदानी कर लादला जात आहे त्याचा आम्ही विरोध करतोय. अदानी कर हा भाजपच्या आदेशाने लावला जात असावा, कारण भाजपचे मालक अदानी त्यांना मुंबई लुटायची आहे. हे जर थांबलं नाही तर आम्हाला आंदोलन हाती घ्यावं लागेल असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई महानगर पालिकेने एकनाथ शिंदे यांचा खोटारडेपणा समोर आणला. पालिकेने 26 टक्के काम झाल्याचा दाव केला आहे, पण ही काम नियोजन पद्धतीने झाली पाहिजे. मुंबईत कुठेही खोदून ठेवलेलं आहे. या सर्व कामांच ऑडिट
झालं पाहिजे आणि गरजेच्या रस्त्यांची काम सर्वात आधी झाली पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.