बेळगावला केंद्रशासित प्रदेश करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी! आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. त्यामुळे मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मुंबई नाही तर बेळगाव केंद्रशासित प्रदेश व्हायला हवा अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच आता जाहिर करावी, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवन परीसरात पत्रकारांशी बोलताना केली.

कर्नाटकातील कॉग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी कर्नाटक विधानसभेत केली. त्यांच्या या मागणीचा आदित्य ठाकरे यांनी चागलाच समाचार घेतला. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱया आमदार सवदी यांनाच बरखास्त करायला हवे. काँग्रेस पक्षश्रेष्ठाRनी सवदी यांना समज द्यावी असे आदीत्या ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्टही केली आहे. “मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही. मुंबई ही आमची मायभूमी आहे. इथला प्रत्येक कण मराठी माणसाने आपले रक्त सांडून मिळवला आहे. मुंबई आम्हाला कोणी आंदण दिलेली नाही. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठाRनी त्यांच्या आमदारांना समज द्यावी’’, असे त्यांनी त्यात नमूद केले आहे.