मोदींचा दौरा, व्हीआयपीमुळे मुंबईकरांना त्रास का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

पंतप्रधान मुंबई भेटीवर येणार असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक बंद ठेवल्याने मुंबईकरांची कोंडी झाली आहे. एखादा व्हीआयपी मुंबईत आला म्हणून त्याचा मुंबईकरांना त्रास का असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, कामाला जाण्याच्या दिवशीच मुंबईतले ट्रॅफिक अडवून ठेवलं जातंय. पश्चिम द्रुतगती मार्गावरून लोक ऑफिसला जातात. पण ट्रॅफिक जॅममुळे लाखो लोक अडकले आहेत. व्हीआयपी आल्यामुळे 20 मिनिटं ट्रॅफिक अडवून ठेवलं जातं. ज्या कार्यक्रमाला व्हीआयपी येतात ते कार्यक्रम शनिवारी किंवा रविवारी का घेत नाहीत? हे कार्यक्रम कामाच्या दिवशी का ठेवले जातात? इलेक्शनच्या काळात जसं हेलिकॉप्टर वापरतात तसे का नाही वापरत? एखादा व्हीआयपी आला तर त्याचा त्रास मुंबईकरांनी का सहन करायचा? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.