भाजप नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली होती. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. हे गलिच्छ आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
वसंत देशमुख यांचा तो व्हिडीओ एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे यांनी गलिच्छ !
हे आहे आपल्या राज्याचा भाजपकारण झालं आहे . आपण हे स्विकारायचं का? असा सवाल उपस्थित केला आहे.
गलिच्छ !
हे आहे आपल्या राज्याचा भाजपकारण. आपण हे स्विकारायचं का? pic.twitter.com/cyFaAT8DpA— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 26, 2024
दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले की, संगमनेरच्या सभेत विखेच्या कार्यकर्त्याने, “निवडणुकीच्या काळात आम्ही मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही”, अशी थेट धमकी देत तिच्या चारित्र्यावरही शिंतोंडे उडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुजय विखे व्यासपीठावरच होते. अशी वक्तव्य करणारा व्यक्ती वयाने ज्येष्ठ दिसतो. महिलांबद्दल अशी भाषा भाजपावालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रिजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकाऱ्यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. राज्यातील माता भगिनी या अपमानाचा व्याजासह निवडणुकीत बदला घेतील असेही नाना पटोले म्हणाले.