शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी प्रचार फेरीचा शुभारंभ केला. यावेळी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेकडोंच्या संख्येने वरळीकरांनी आदित्य ठाकरे यांना प्रतिसाद दिला. वरळी ‘ए प्लस’ बनवण्याचा निर्धारच त्यांनी यावेळी केला. वरळीत मशाल धगधगणार असाच विश्वास ठिकठिकाणी मतदारांनी व्यक्त केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी स्थानिक तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला.