पर्यावरणमंत्र्यांवर राजकीय प्रदूषण करण्याची जबाबदारी; आदित्य ठाकरे यांचा भाजपला टोला

सध्या देशभरात राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा विषय चर्चेत आला आहे. दिल्लीतील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. तसेच गंगा, यमुना आणि देशातील इतर नद्याही प्रदूषित झाल्या आहेत. तसेच भाजपकडून देशभराच राजकीय प्रदूषणही पसरवण्यात येत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी जबरदस्त टोला लगावला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडून राज्यांतील प्रदूषणाबद्दल कोणी ऐकले आहे का? नाही. कारण त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने राजकीय प्रदूषण परवण्याची जबाबदारी टाकली आहे. शेम …असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.