![aaditya thackeray pc bmc budget](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/aaditya-thackeray-pc-bmc-budget-696x447.jpg)
माघी गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली होती, पण पीओपीच्या मुर्ती असल्याने या मुर्ती विसर्जन करता आल्या नाहीत. यासाठी सरकार पर्यायी व्यवस्था का निर्माण करता येत नाही असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विचारला.
आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, गणपती बाप्पाचं विसर्जन रोखण्यासाठी जश्या ऑर्डर्स दाखवता, तश्याच ऑर्डर्स राजकीय होर्डिंग्ससाठीही आहेत! त्या कश्या दिसत नाहीत? की सत्ताधारी राजकारण्यांना ह्या ऑर्डर्स लागू नाहीत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
तसेच का नाही सरकार पर्यायी व्यवस्था निर्माण करू शकत? का नाही मंडळांची बैठक घेऊन मदत करत? ह्यांची विचारधारा एकच आहे – आपलं मराठमोळं हिंदुत्व, आपल्या मातीची ओळख पुसून, ह्यांची राजकीय विचारधारा आपल्यावर लादायची असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
गणपती बाप्पाचं विसर्जन रोखण्यासाठी जश्या ऑर्डर्स दाखवता, तश्याच ऑर्डर्स राजकीय होर्डिंग्ससाठीही आहेत! त्या कश्या दिसत नाहीत? की सत्ताधारी राजकारण्यांना ह्या ऑर्डर्स लागू नाहीत?
का नाही सरकार पर्यायी व्यवस्था निर्माण करू शकत? का नाही मंडळांची बैठक घेऊन मदत करत?
ह्यांची…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 10, 2025