नाल्यात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत. कुर्लाच्या नेहरूनगर येथील शिवसृष्टी स्वामी विवेकानंद शाळेसमोर एक नाला आहे. आज सकाळी नाल्यात महिलेचा मृतदेह एका नागरिकाला दिसला. त्याने याची माहिती नेहरूनगर पोलिसांना दिली. त्यानंतर काहीच वेळात नेहरूनगर पोलीस घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या जवानाने महिलेचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. मृत महिला ही 50-55 वयोगटातील आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नाही.