ऐकावं ते नवलच! महिलेने वाढवली 4 फूट लांब नखे

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन्ही हाताची नखे तब्बल 4 फूट लांब वाढवली आहेत. मारिया असं या महिलेचं नाव असून ती आपल्या 5 मुलांसोबत राहते. मारिया टिकटॉक स्टार सुद्धा आहे. तसेच ती एक नेल आर्टिस्ट सुद्धा आहे. ती नेहमी टिकटॉकवर आपले व्हिडीओ शेअर करते.

दोन्ही हाताच्या बोटांची नखे 4 फूट लांब असल्याने मारिया तिची दैनंदिन कामे कशी करते, असा प्रश्न तिला सतत विचारला जात आहे, हा एकच प्रश्न ऐकून आता कंटाळा आलाय, असे मारिया सांगते. नखे वाढवल्यानंतर याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. नखांना रोज स्वच्छ करावे लागते. यासाठी ती बहिणीची मदत घेते, असे ती म्हणाली.