एकेकाळी मिरच्या- कोथिंबीर – कडीपत्ता असा मसाला अगदी 10 रुपयांना मिळायचा. आता ही परिस्थिती नाही. अशातच 100 ग्रॅम कोथिंबीरचा भाव कुणी 140 रुपये सांगितला तर चीडचीड तर होणारच ना… गुरुग्रामच्या हर्ष उपाध्याय याच्या बाबत असेच काहीसे झाले. ‘झेप्टो’वर कमर्शिअल अॅपवर त्याने काsंथिबीरचा भाव बघितला आणि डोळेच पांढरे झाले. ‘झेप्टो’वर 100 ग्रॅम कोथिंबीर 21 टक्के डिस्काऊंट देऊन 140 रुपये दराने विकली जात आहे. हर्ष उपाध्यायने स्क्रीनशॉट ‘एक्स’वर शेअर करून याची माहिती दिल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चेला उधाण आले. नेटीजन्स जोरदार कमेंट्स करत आहेत. अनेकांनी संताप व्यक्त केला. कोथिंबीर विकतात की ड्रायप्रूट असे सवाल नेटीजन्स करत आहेत. ही तर दिवसाढवळ्या लूट असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. कदाचित हा चंद्रावर पिकवलेली कोथिंबीर असल्याच्या मजेशीर कमेंट्सही येत आहेत.