कर्नाटकात प्रचारात मुख्यमंत्र्यांजवळ बंदूक घेऊन पोहोचला, सुरक्षा व्यवस्थेत झाली गंभीर चूक

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामैया यांच्या रोड शोमध्ये एक जण पिस्तूल घेऊन पोहोचला. ही व्यक्ती सिद्धरामैया यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. सिद्धरामैया खुल्या वाहनात उभे होते. या वेळी सिद्धरामैया यांना त्यांच्या बाजूला उभे असलेल्या परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी हार घातला. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक झाल्याचे समोर आले आहे. रियाज असे बंदूक कमरेला लटकवून मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभ्या राहिलेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे उघड झाले. रियाजवर काही वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. तेव्हापासून तो पिस्तूल बाळगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वसंरक्षणासाठी रियाजला पिस्तूल बाळगण्याची परवानगी देण्यात आल्याचे पोलीस म्हणाले.